Swine Flu : राज्यात पाच दिवसांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात वाढ, १७८ नव्या रुग्णांची नोंद

रुग्णांमध्ये एच३एन२ रुग्णांची संख्या जास्त आहे

126
Swine Flu : राज्यात पाच दिवसांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात वाढ, १७८ नव्या रुग्णांची नोंद
Swine Flu : राज्यात पाच दिवसांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णात वाढ, १७८ नव्या रुग्णांची नोंद

ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची नोंद राज्य आरोग्य विभागाने केली. पाच दिवसांमध्ये राज्यात स्वाईन फ्लूच्या १७८ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ‘एच३एन२’ रुग्णांची संख्या जास्त आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. देशपातळीवर विविध उपाययोजना केल्याने मध्यंतरीच्या काळात ‘एच३एन२’चे रुग्ण घटले होते.

जुलैपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मात्र ऑगस्टच्या पाच दिवसांमध्येच राज्यामध्ये १७८ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. ‘एच१एन१’चे ६९ तर ‘एच३एन२’चे १०९ रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. रुग्णांच्या उपचारांकरिता सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यक औषधोपचार व साधनसामुग्रीचा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – व्हिएतनाम बरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी भारताने चर्चा केली सुरू)

स्वाईन फ्लूची लक्षणे –

सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी

प्रतिबंधात्मक उपाय –

  • डोळे, नाक, तोंडाला सतत हात लावू नये.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • खोकला, शिंका आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा.
  • फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा.
  • आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नका.
  • रुग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • पौष्टिक आहार घ्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.