Delimitation Bill नंतर कसा बदलणार भारताचा राजकीय नकाशा? पहा…

त्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यात सीमांकनानंतर  (Delimitation Bill)  नवीन संसदेचा नकाशा आहे.

1
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकाशी (Delimitation Bill) निगडित घटना दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे. या विधेयकाला आवश्यक दोन तृतीयांश बहुमताचा आकडा जुळवण्यात सत्ताधारी भाजपाला यश आल्याचे बोलले जाते. प्रस्तावित सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सीमांकनानंतर  (Delimitation Bill)  भारतीय संसदेचे चित्र स्पष्ट केले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या नकाशानुसार विद्यमान लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ इतक्या होतील.
Image
मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यात सीमांकनानंतर  (Delimitation Bill)  नवीन संसदेचा नकाशा आहे. या नकाशात स्पष्टपणे सीमांकनानंतर कुठल्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात किती लोकसभा जागा असतील हे दिसते. सीमांकन झाल्यानंतर भारताच्या लोकसभेत एकूण ८१६ खासदार असतील. त्यात २८ राज्यातील ७८९ आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील २७ खासदारांचा समावेश असेल. सीमांकन विधेयक  (Delimitation Bill)  मंजूर झाल्यास सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशातील राज्यात असतील. जिथे विद्यमान ८० जागांमध्ये ४० जागांची वाढ होऊन १२० आकडा होईल. सर्वात कमी लोकसभेच्या जागा सिक्किम, मिझारोम, नागालँडमध्ये असतील. जिथे प्रत्येकी २ जागा राज्यांना मिळतील. दिल्ली सर्वाधिक ११ लोकसभा जागा असणारा केंद्रशासित प्रदेश होईल. अंदमान आणि निकोबार, लक्षद्विप, लडाख येथे १-१ लोकसभा जागा असतील. (Delimitation Bill)
राज्य – सध्याच्या जागा – नंतरच्या जागा – वाढणाऱ्या जागा
  • उत्तर प्रदेश ८०-१२०-४०
  • महाराष्ट्र ४८-७२-२४
  • पश्चिम बंगाल ४२-६३-२१
  • बिहार ४०-६०-२०
  • तामिळनाडू ३९-५९-२०
  • मध्य प्रदेश २९-४३-१४
  • कर्नाटक २८-४२-१४
  • गुजरात २६-३९-१३
  • आंध्र प्रदेश २५-३८-१३
  • राजस्थान२५-३८-१३
  • ओडिशा २१-३१-१०
  • केरळ २०-३०-१०
  • तेलंगणा १७-२६-९
  • आसाम १४-२१-७
  • झारखंड १४-२१-७
  • पंजाब १३-२०-७
  • छत्तीसगड ११-१६-५
  • हरियाणा १०-१५-५
  • उत्तराखंड ५-८-३
  • हिमाचल प्रदेश ४-६-२
  • अरुणाचल प्रदेश २-३-१
  • गोवा २-३-१
  • मणिपूर २-३-१
  • मेघालय २-३-१
  • त्रिपुरा २-३-१
  • मिझोराम १-२-१
  • नागालँड १-२-१
  • सिक्कीम १-२-१
केंद्रशासित प्रदेश
  • दिल्ली ७-१-१४
  • जम्मू आणि काश्मीर ५-७-२
  • दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव २-२-०
  • अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह १-१-०
  • चंदीगड १-२-१
  • लडाख १-१-०
  • लक्षद्वीप १-१-०
  • पुदुच्चेरी १-२-१

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.