अमरावतीत Love Jihad चा भयंकर चेहरा; ‘राजू’ बनून हिंदू मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या रियाजुद्दीनला ठोकल्या बेड्या

हे प्रकरण केवळ बलात्काराचे (Love Jihad) नसून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पीडित हिंदू तरुणीच्या बोलण्यावरून निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेली फेरीवाल्यांची दादागिरी थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

77
Illustration depicting the issue of Love Jihad in Amaravati.
A striking illustration highlighting the Love Jihad issue.

अमरावती शहरात रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणाऱ्या एका नराधम जिहादी मुस्लिम फेरीवाल्याने स्वतःची हिंदू अशी ओळख करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून (Love Jihad) त्यांचे सातत्याने लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पीडित हिंदू युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन मुस्लिम आरोपींना अटक केली आहे.

हे प्रकरण नुसते एका हिंदू तरुणीला फसवायचे नसून यातील मुख्य आरोपी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याने याच पद्धतीने अनेक हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण (Love Jihad) केले असल्याचा खळबळजनक आरोप पीडित हिंदू युवतीने केला आहे. रियाजउद्दीनची चायनीज गाडी पंचवटी चौकात बीपीएड कॉलेज जवळ उभी असते. तो त्याच्याकडे येणारी हिंदू तरुणींना स्वतःची हिंदू असल्याची ओळख सांगतो, त्यातील ज्या हिंदू तरुणी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, लग्न ठरत नाही किंवा कुठल्यातरी समस्येने ग्रस्त आहेत, अशा तरुणींना सुरुवातीला आधार देण्याचे नाटक करतो, त्यानंतर त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करून त्यांचे लैंगिक शोषण करतो.

(हेही वाचा Crime : लोकलमध्ये तृतीयपंथीयांची दादागिरी; पैसे देण्यास नकार दिल्याने ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण)

रियाझउद्दीन स्वतःचे नाव राजू असे सांगायचा. शिवाय आपल्याला बंगाली जादू येते आणि त्या जादूच्या आधारे तुला समस्येतून मुक्त करून देईल, अशी भोंदूगिरी देखील तो करायचा. समस्याग्रस्त हिंदू तरुणींना तो अज्ञात स्थळी नेऊन उपचाराच्या नावाखाली हळूहळू त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला अत्तर लावणे आणि असे करता करता त्या युवतींवर शारीरिक ताबा मिळवायचा असे भयंकर प्रकार हा रियाजुद्दीन करायचा. अमरावती पोलिसांनी रियाजुद्दीन फैयाजुद्दीन पठाण याच्यासह आणखी एकाला अटक केली आहे. पण हे प्रकरण केवळ बलात्काराचे (Love Jihad) नसून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पीडित हिंदू तरुणीच्या बोलण्यावरून निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेली फेरीवाल्यांची दादागिरी थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

परतवाड्याचे प्रकरण जेवढे गंभीर आहे तेवढेच किंवा त्याहूनही जास्त गंभीर प्रकरण रियाजुद्दीनचे आहे. ज्या ज्या युवती याच्या जाळ्यात फसल्या त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढून त्यांना नेहमीसाठी ब्लॅकमेल करण्याची पद्धत रियाजउद्दीन वापरत होता. अमरावती पोलिसांनी याप्रकरणी केवळ एक बलात्काराचे प्रकरण न पाहता यामागे सक्रिय असलेले रियाजउद्दीन व त्याच्या साथीदारांचे रॅकेट शोधून काढले पाहिजे, असे  भाजप महाराष्ट्र  प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी अमरावती पोलिसांना केली आहे. (Love Jihad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.