Himanta Biswa Sarma : चारचापोरी भागातील मुसलमानांकडे १० वर्षे मते मागणार नाही; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असे का म्हणतात

59
Himanta Biswa Sarma : चारचोपरी भागातील मुसलमानांकडे १० वर्षे मते मागणार नाही; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असे का म्हणतात
Himanta Biswa Sarma : चारचोपरी भागातील मुसलमानांकडे १० वर्षे मते मागणार नाही; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा असे का म्हणतात

पुढील 10 वर्षे तरी राज्यातील चारचापोरी भागात राहणाऱ्या मुस्लिमांना मते मागणार नाही. (Himanta Biswa Sarma) भाजप सरकार चारचापोरी भागात राहणाऱ्यांसह समाजातील सर्व लोकांच्या भल्यासाठी काम करते. मात्र निवडणुकीदरम्यान मी त्यांची मते मागणार नाही. त्यांनी बालविवाह करणे थांबवल्यानंतर, कट्टरतावादी भूमिका सोडल्यानंतर, त्यांच्या मुलींना शाळेत पाठवल्यानंतरच ते त्यांना भाजपला मतदान करण्याचा आग्रह करतील, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सांगितले. ते गुवाहाटी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. आसाममध्ये चारचापोरी हे ब्रह्मपुत्रा नदीचे क्षेत्र आहे आणि तिच्या उपनद्या पुराच्या मैदानी गाळाने बनलेल्या आहेत. (Himanta Biswa Sarma)

(हेही वाचा – Asian Games 2023 : तिरंदाजीतही भारताला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता)

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, “भाजपला मत देण्यासाठी काही निकष आहेत. आम्ही अशा लोकांची मते मागतो ज्यांना दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुले नाहीत. निवडणुका आल्या की, मी स्वत: त्यांना विनंती करीन की, ‘आम्हाला मतदान करू नका.’ जेव्हा तुम्ही कुटुंब नियोजनाचे पालन कराल, बालविवाहासारख्या प्रथा थांबवाल आणि कट्टरतावादाला आळा घालाल, तेव्हा आम्हाला मतदान करा आणि हे सर्व पूर्ण होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. त्यामुळे आता नाही, तर १० वर्षांनी मते मागू. (Himanta Biswa Sarma)

भाजपला मतदान करणार्‍या मुसलमानांना २-३ पेक्षा अधिक मुले नसावीत. त्यांनी मुलींना शाळेत पाठवावे, कट्टरतावाद सोडून सुफी धर्म स्वीकारावा. या अटींची पूर्तता झाल्यावर मी तुमच्याकडे मते मागायला चार चोपरी येथे येईन.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चारचापोरी भागात राहणाऱ्या मुस्लिमांची मानसिकता बदलत आहे; पण त्याला वेळ लागेल. त्यासाठी किमान 10 वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर मी व्यक्तिश: चार भागात जाऊन त्यांना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करेन. दरम्यान, आसाममधील जनता नरेंद्र मोदींना उत्स्फूर्तपणे मतदान करतील, असा दावाही सरमा यांनी केला. (Himanta Biswa Sarma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.