Harshvardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

नितीन गडकरींना भेटण्यासाठी आले होते

132
Harshvardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका
Harshvardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडचे माजी आमदार तथा बीआरएस (BRS) चे नेते हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नवी दिल्ली स्थित त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील आर एम एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, हर्षवर्धन जाधव काही कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ आर एम एल (RML) रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – ….या कारणामुळे त्याने ‘आरडीएक्स’ वाहतुकीची खबर पोलिसांना दिली)

हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी गत मार्च महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी गत लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यात त्यांना लाखो मते मिळाली. यामुळे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तर शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाची चव चाखावी लागली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.