Gujarat Assembly Election 2022 : भाजपने मोडला काँग्रेसचा ३७ वर्षांचा रेकॉर्ड

104
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवार, ८ डिसेंबर २०२२ रोजी लागला आहे. संध्याकाळी बऱ्यापैकी जागांचे निकाल घोषित करण्यात आले. यात भाजपने १५६ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने १७ जागांवर विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला आहे, तर ४ जागांवर अपक्षांनी बाजी मारली. मात्र भाजपचा गुजरातमधील विजय हा रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. काँग्रेसने १९८५ मध्ये १४९ जागांवर विजय मिळवला होता.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, भाजपने १२४ जागांवर विजय मिळवला असून ३२ जागांवर आघाडीवर असल्याचे म्हटले. भाजपचा हा विजय गुजरात विधानसभा निवडणुकांमधील  सर्वात मोठा विजय ठरला आहे. त्याशिवाय, भाजपने २० वर्षांपूर्वीचा सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. भाजपने ३७ वर्षे काँग्रेसचा जुना मोठा विजय मिळवला आहे. माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 1985 मध्ये 149 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागांमध्ये घट झाली.

काँग्रेसने कधी किती जागा जिंकल्या होत्या 

गुजरातमध्ये काँग्रेसची मोठी राजकीय ताकद होती. त्यांच्यानंतर जनसंघ, जनता दल आणि भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. गुजरातमध्ये झालेल्या १९८० मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर १९८५च्या विधानसभा निवडणुकीत १४९ जागांवर विजय मिळवला होता. जनता पार्टीला १४ आणि भाजपला ११ जागांवर विजय मिळवला होता. अपक्षांनी ८ जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी अमरसिंह चौधरी हे मुख्यमंत्री झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.