Lok Sabha Election : गौरव वल्लभ भाजपावासी, काँग्रेसवर सनातन विरोधी असल्याचा आरोप

पाठवलेल्या राजीनाम्यामध्ये गौरव वल्लभ यांनी लिहिले आहे की, मी पक्षात आलो त्यावेळी काँग्रेस सर्वात जुना पक्ष आहे, असे मी मानत होतो. इथे बौद्धिक लोकांची, युवकांच्या कल्पनांना वाव मिळतो. पण मागील काही वर्षांत माझ्या लक्षात आले की, पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या युवकांना सामील करून घेऊ शकत नाही.

103
Lok Sabha Election : गौरव वल्लभ भाजपावासी, काँग्रेसवर सनातन विरोधी असल्याचा आरोप

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. त्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, सध्या काँग्रेस पक्ष चुकीच्या दिशेने जात आहे. एकीकडे जात आधारित जनगणनेवर बोलत असताना दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचे दिसून येते. हे काँग्रेसच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहे. आर्थिक धोरणांबाबत पक्षाची भूमिका सतत विरोधी असल्याचे दिसते, असे म्हणत गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षांला घरचा अहेर दिला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) काळात चांगलीच कोंडी झाली आहे. (Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीत काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. कालच बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला, तर गुरुवारी पक्षाचे बडे नेते व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनीही पक्षाला राम राम ठोकला. सलग दोन दिवसांत दोन नेत्यांनी पक्षाला धक्का दिला आहे. गौरव वल्लभ यांनी पक्ष सोडताना गंभीर आरोपही केले आहेत. गौरव वल्लभ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून, त्यांनी अनेक व्यासपीठांवर सरकारच्या ध्येय-धोरणांवर काँग्रेसची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांची आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी गुरुवारी एक्स हँडलवर पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Nikhat, Manika Get Govt Help : निखत झरीन, मनिका बात्रा यांना टॉप्स अंतर्गत सरकारची मदत)

काँग्रेस पक्षाची कोंडी

काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणूकीच्या काळात चांगलीच कोंडी झाली आहे. गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी एक्सवर म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आज ज्याप्रकारे दिशाहीन होऊन पुढे जात आहे, त्यासोबत जाणे मला शक्य नाही. मी सनातनविरोधी नारे देऊ शकत नाही. हेल्थ क्रिएटर्सला शिव्या देऊ शकत नाही. त्यामुळे मी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. (Lok Sabha Election)

पाठवलेल्या राजीनाम्यामध्ये गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी लिहिले आहे की, मी पक्षात आलो त्यावेळी काँग्रेस सर्वात जुना पक्ष आहे, असे मी मानत होतो. इथे बौद्धिक लोकांची, युवकांच्या कल्पनांना वाव मिळतो. पण मागील काही वर्षांत माझ्या लक्षात आले की, पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या युवकांना सामील करून घेऊ शकत नाही. पक्षाचा कार्यकर्त्यांशी कनेक्ट पूर्ण तुटला आहे. राम मंदिराबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरही वल्लभ यांनी आक्षेप घेतला. पक्षाच्या या भूमिकेमुळे आपण स्तब्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इंडी आघाडीतील काही नेत्यांकडून सनातन धर्माविरोधात सतत वक्तव्य केली जात आहेत. त्यावर काँग्रेसकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नाही, अशी टीका वल्लभ यांनी केली. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.