Kartiki Ekadashi 2023 : ठरलं ! विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते

187
Kartiki Ekadashi 2023 : ठरलं ! विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते
Kartiki Ekadashi 2023 : ठरलं ! विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. यंदा मात्र दोन उपमुख्यमंत्री असताना कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा कोण करणार असा पेच प्रसंग पडला होता. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. (Kartiki Ekadashi 2023)

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्याने. मराठा समाजाकडून पंढरपूरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात होतं. दरम्यान, मराठा समाजाने आपलं हे आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे अर्धा तास आंदोलकांना भेटून चर्चा देखील करणार आहेत. मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य झाल्या आहेत. (Kartiki Ekadashi 2023)

(हेही वाचा : Panas Pilgrimage Project: शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे)

या आहेत मागण्या
सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या.

म्हणून आंदोलन घेतले मागे
प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध व आंदोलन मागे घेतले असून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री हे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. (Kartiki Ekadashi 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.