Electoral bonds data : धोनीच्या ‘सीएसके’कडून इलेक्टोरल बॉण्डद्वारे या पक्षाला मिळाला ६ कोटींचा निधी

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज आणि तिचे प्रवर्तक इंडिया सिमेंट यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षाला देणग्या दिल्याचे निवडणूक आयोगाने उघड केले. त्यांनी तामिळनाडूतील ए.आय.ए.डी.एम.के या पक्षाला देणगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

160
Electoral bonds data : धोनीच्या 'सीएसके'कडून इलेक्टोरल बॉण्डद्वारे या पक्षाला मिळाला ६ कोटींचा निधी

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. यावर्षी म्हणजेच २०२४ च्या हंगामात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा या संघाचं नेतृत्व करणार आहे. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज निवडणूक रोख्यांमुळे (Electoral bonds data) विशेष चर्चेत आली आहे.

(हेही वाचा – Rajnath Singh आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची चर्चा; प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य या मुद्यांवर विशेष लक्ष)

एआयएडीएमकेला सीएसकेची देणगी :

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज आणि तिचे प्रवर्तक इंडिया सिमेंट यांनी निवडणूक रोख्यांच्या (Electoral bonds data) माध्यमातून राजकीय पक्षाला देणग्या दिल्याचे निवडणूक आयोगाने उघड केले. त्यांनी तामिळनाडूतील ए.आय.ए.डी.एम.के या पक्षाला देणगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ए.आय.ए.डी.एम.के या पक्षाला निवडणूक रोख्यांमध्ये जवळ – जवळ ६ कोटी रुपये मिळाले आहेत.

(हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरे रालोआत? दोन जागांची मागणी)

सीएसके आणि इंडिया सिमेंटने ५ कोटी ९० लाख रुपयांची देणगी (Electoral bonds data) दिली आहे. याशिवाय २९ रोखे प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचे आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हा सर्व निधी २ एप्रिल ते ४ एप्रिल २०१९ या कालावधीत प्राप्त झाला आहे. त्यानंतरच्या वर्षांमध्ये पक्षाला कोणतेही निवडणूक रोखे मिळाले नाहीत.

(हेही वाचा – Naxalite Killed : रेपनपल्लीच्या जंगलात सी-सी-60 जवानांची कारवाई; 4 नक्षलवादी ठार)

तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेचे ९ आमदार आहेत. त्याचे राजस्थानमध्ये तीन खासदार आहेत आणि लोकसभेत एकही खासदार नाही. (Electoral bonds data)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.