Raj Thackeray : राज ठाकरे रालोआत? दोन जागांची मागणी

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षने रालोआतील घटक पक्षांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.

343
Raj Thackeray Press Conference: राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देत निवडणुकीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षने रालोआतील घटक पक्षांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनसे सुद्धा रालोआत येण्याची चिन्हे आहेत. (Raj Thackeray)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज भाजप (Bjp) नेत्यासोबत गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हेही उपस्थित राहतील. (Raj Thackeray)
उभय नेत्यामधील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राका आणि मनसे मिळून लोकसभेची निवडणूक लढन्याच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे समजते. भाजपाकडून मनसेला दोन जागा सोडणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. यात नाशिक आणि दक्षिण मुंबई या दोन जगाचा समावेश असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

भाजप, सेना आणि राका मध्ये जागा वाटपाचा प्रश्न अद्याप कायम आहे. एक दोन दिवसात यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप (Bjp)-मनसे युतीची चर्चा आहे. या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत.  कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला आले आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत उपस्थित आहेत, या गोष्टींचे संकेत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित आहेत. तसेच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीसाठी हे नेते दिल्लीत आहेत.
मनसे पक्षाने 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. पण यावेळी भाजपसोबत युती केल्यास मनसे मुंबईतील लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवू शकते. मनसेही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Raj Thackeray)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.