Eknath Shinde : राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदेच हायकंमाड; काय म्हणाले संजय शिरसाट?

127

भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महायुतीमध्ये हायकंमाड असल्याचे वक्तव्य केले. यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राज्य सरकारमध्ये हायकमांड एकनाथ शिंदे आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांचे सहकारी आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

शिंदे सरकारचे हायकमांड देवेंद्र फडणवीस हेच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीस यांना चांगलेच समजते. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असं सूचक विधान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले होते. गोरे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना गोरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग )

…तर आमदाराकी सोडेल

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते. भेटत नव्हते. आम्ही अजित पवारांकडे जायचो तर ते म्हणायचे उद्धव ठाकरेंना सांगा. रिमार्क्स आणा. मी तुम्हाला निधी देतो. पण उद्धव ठाकरे रिमार्क देतच नव्हते. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांची माझ्या एकाही पत्रावर एक जरी सही दाखवली तरी मी आमदारकी सोडेल, असा दावा त्यांनी केला.

तेव्हा आमचा मुख्यमंत्री बरोबर नव्हता

संजय शिरसाट म्हणाले की, तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असल्या तरी सर्वांचा एकमुखी निर्णय होतो, त्याला महत्त्व आहे. खातं घेण्यापूर्वीच अजित पवार यांना टार्गेट का करत आहात? तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. तेव्हा आम्ही अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले याचे कारण आमचा मुख्यमंत्री बरोबर नव्हता. अजित पवार अधिकाराचा वापर करायचे. त्यांनी अधिकाराचा वापर केला ते गैर नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. आम्हाला झोप लागली होती. आम्हाला कुंभकर्णाची झोप लागली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.