केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून २७ जुलै रोजी हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला पाठवण्यात आले होते. हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाने लिहिले आहे.(EC Letter to Sunetra Pawar)
(हेही वाचा: भिवंडी इमारत दुर्घटनेतील ‘हिरो’ ठरला खड्ड्यांचा बळी! मुंबई-नाशिक महामार्गावर TDRF जवानाचा अपघाती मृत्यू)
पक्षाच्या घटनेतील दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करा
अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीची कार्यकारिणी बोलावण्यात आली होती. या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आयोगाच्या मते, २६ फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम १८(१) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. तथापि, पक्षाने कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही बदल केले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. आयोगाकडून या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आले आहे.(EC Letter to Sunetra Pawar)
(हेही वाचा: VIDEO: ग्रीसमध्ये वणवा विझवणाऱ्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर; पाहा नेमकं काय घडलं?)
निवडणूक आयोग आणि पक्षांमध्ये अशा प्रकारचा पत्र व्यवहार सुरूच असतो, वेगवेगळ्या कारणांमुळे असा पत्रव्यवहार होतो. हा नियमित पत्रव्यवहाराचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत का, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.(EC Letter to Sunetra Pawar)
Join Our WhatsApp Community

