ग्रीसमधील अटिका (Attica) प्रदेशातील Psatha परिसरात जंगलातील भीषण आग आटोक्यात आणण्याच्या मोहिमेदरम्यान रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. अथेन्सच्या वायव्य भागात आग विझवण्यासाठी गेलेल्या दोन अग्निशमन हेलिकॉप्टरांची हवेत धडक झाली. या दुर्घटनेत एका ग्रीक आणि एका डेन्मार्कच्या नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण बचावले. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.(Greece Helicopter Collision Video)
(हेही वाचा : भिवंडी इमारत दुर्घटनेतील ‘हिरो’ ठरला खड्ड्यांचा बळी! मुंबई-नाशिक महामार्गावर TDRF जवानाचा अपघाती मृत्यू)
अथेन्सच्या वायव्य भागातील या आगीमुळे १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून, आग विझवण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स कार्यरत होती. ग्रीक अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर (लीजवर) घेण्यात आली होती. त्यांनी एलेफसिना लष्करी विमानतळावरून उड्डाण केले होते. अथेन्सच्या पश्चिमेला सुमारे ६५ किमी (४२ मैल) अंतरावर हवेत ही हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली. धडकेनंतर एका हेलिकॉप्टरला आग लागून ते दरीत कोसळले. यातील ग्रीक अग्निशमन दलाच्या संपर्क अधिकाऱ्याचा आणि डॅनिश पायलटचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले. दुसऱ्या हेलिकॉप्टरमधील ब्रिटिश पायलट आणि आणखी एक ग्रीक समन्वयक बचावले आहेत.(Greece Helicopter Collision Video)
ग्रीसमध्ये जंगलातील आग विझवताना दोन अग्निशमन हेलिकॉप्टरांची हवेत धडक
ग्रीसमधील अटिका (Attica) प्रदेशातील Psatha परिसरात जंगलातील भीषण आग आटोक्यात आणण्याच्या मोहिमेदरम्यान दोन अग्निशमन हेलिकॉप्टरांची हवेत धडक झाली.
अथेन्सच्या वायव्य भागातील या आगीमुळे १०० हून अधिक घरांचे नुकसान… pic.twitter.com/dkfrugORkF
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 3, 2026
(हेही वाचा : Vishwesh Negi यांची Iran मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती; मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा)
युरोपमध्ये वणव्याचे संकट तीव्र
सध्या युरोपातील अनेक देशांमध्ये जंगलातील आगीने भीषण रूप धारण केले आहे. ग्रीसमध्येही जोरदार वाऱ्यांमुळे आगीचा वेग वाढला असून, तिच्या ज्वाळा अथेन्सच्या उपनगरांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. अनेक पर्यटनस्थळांनाही या आगीचा फटका बसला असून, अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.(Greece Helicopter Collision Video)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


