Election Commission : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त

119

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवार, १४ मार्च रोजी दोन माजी सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी (Election Commission) नेमणूक केली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे आता निवडणूक आयुक्त असतील. विशेष म्हणजे याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही, पण बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र बैठकीतून बाहेर येऊन माध्यमांना याची माहिती दिली.

(हेही वाचा Baba Siddique : उत्तर मध्य मुंबईत बाबा सिद्दीकी यांना मिळणार उमेदवारी?)

अरुण गोयल यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त पदावरील तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे आयुक्तपद रिकामे होते. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना आयुक्तांनीच राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या समितीने दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आयोगावर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली आहे. काँग्रेसचे नेते, खासदार अधीर रंजन चौधरी हे पंतप्रधानांच्या समितीमधील एकमेव विरोधी पक्षातील नेते आहेत. चौधरी यांनी माध्यमांशी बोलत असताना याची माहिती दिली. चौधरी म्हणाले की, समितीसमोर उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदभर पांडे, सुखबीर संधू, सुधीर कुमार आणि गंगाधर रहाटे यांची नावे होती. त्यातून आम्ही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.