Baba Siddique : उत्तर मध्य मुंबईत बाबा सिद्दीकी यांना मिळणार उमेदवारी?

कालिना मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असल्याने हे मतदार भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे विलेपार्ले मतदारसंघाप्रमाणेच आपल्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देतील असा दावा बाबा सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आला आहे.

232
Baba Siddique : उत्तर मध्य मुंबईत बाबा सिद्दीकी यांना मिळणार उमेदवारी?

मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खासदार पुनम महाजन यांच्या जागी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाकडून देण्याचे सुरु असतानाच या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला असून या ठिकाणी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. (Baba Siddique)

(हेही वाचा – Paytm Fastag Recharge : पेटीएम युजर्स १५ मार्चनंतर फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत; आजच आपलं वॉलेट करा शिफ्ट)

राष्ट्रवादीकडून दावा करण्याचे काय कारण आहे?

विलेपार्ले : भाजपा, पराग अळवणी, चांदीवली : शिवसेना, दिलीप लांडे, कुर्ला नेहरू नगर : शिवसेना, मंगेश कुडाळकर, कलिना : शिवसेना उबाठा, संजय पोतनीस, वांद्रे पूर्व : काँग्रेस, झिशान सिद्दीकी आणि वांद्र पश्चिम : भाजपा, अॅड. आशिष शेलार असे मतदार संघ आणि पक्षनिहाय आमदार आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम येथे पूर्वी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आमदार राहून गेले आहेत तसेच वांद्रे पूर्व येथे त्यांचे चिरंजीव जिशान सिद्दीकी असे दोन मतदारसंघ घरचेच आहेत. जेथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच चांदीवली विधानसभा आणि कुर्ला नेहरूनगर विधानसभेत देखील मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला दावा सांगितला आहे. कालिना मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असल्याने हे मतदार भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे विलेपार्ले मतदारसंघाप्रमाणेच आपल्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देतील असा दावा बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्याकडून करण्यात आला आहे. (Baba Siddique)

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे नाव तसे उत्तर मध्य मतदारसंघासाठी नवे नाही. मतदार संघातील जनतेसाठी त्यांची तोंड ओळख बऱ्यापैकी आहे. या आधी काँग्रेसमध्ये असताना बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी प्रिया दत्त यांच्यासाठी याच मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाची चांगली माहिती बाबा सिद्दीकी यांच्याकडे असून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याकारणाने त्यांना या लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसकडून देखील मदत होऊ शकते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा जागा ही महाराष्ट्रातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. त्यात सध्या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी ७,६३,०७८ पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या ९,१६,७९१ आहे. २२ तृतीय लिंग मतदार आहेत. २०१९ मध्ये एकूण मतदारांची संख्या ९,०१,७८४ होती. त्यापैकी एकूण पुरुष मतदार ४,९५,९२० तर महिला मतदार ४,०४,५२६ होते. २०१९ मध्ये एकूण मतदानाची टक्केवारी ५३.६८% होती. (Baba Siddique)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.