अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (India Russia Oil Import) दुसऱ्यांदा सत्तेत कमबॅक केल्यापासून सातत्याने भारताची डोकेदुखी वाढवत आले आहेत. आधी आयातींवर 50 टक्के टॅरिफचा भार लादला तर नंतर पश्चिम आशियात इराणवर हल्ला करून तेलाचा पुरवठा खंडित करून भारताच्या अडचणीत भर घातली, पण इराणसोबत शांतता करार करून आता कुठं दिलासा मिळाला असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताची चिंता वाढवली आहे. (India Russia Oil Import)
हेही वाचा-Terror Attack: नियामे विमानतळावर दहशतवादी हल्ला; हल्ल्यात ११ सैनिक, २२ दहशतवादी ठार
मध्य-पूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणसोबत करार झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे, असे ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. परिणामी महासत्ता लवकरच रशियन तेलावर पुन्हा निर्बंध लादण्याच्या मनःस्थितीत दिसत आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी निम्म्याहून अधिक तेल रशियाकडून आयात करतो, त्यामुळे रशियन तेलावरील निर्बंध पुन्हा लादले तर भारतावर परिणाम होणे अटळ आहे. (India Russia Oil Import)
“इराणसोबत झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाचा प्रवाह सुरू झाल्यामुळे आम्ही लवकरच ते (रशियावर निर्बंध लादणे) करू शकू,” वृत्तसंस्था रॉयटर्सने G7 शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी केलेले विधान उद्धृत केले. युक्रेनवरील हल्यावरून रशियावरील आर्थिक दबाव वाढवण्याच्या उपायांवर फ्रान्समध्ये आयोजित जी7 परिषदेचा मुख्य मुद्दा आहे. यादरम्यान, रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर निर्बंध लादण्यासारख्या उपाययोजनांचाही विचार केला गेला. (India Russia Oil Import)
हेही वाचा- Pune Municipal Corporation : स्वतंत्र सीएसआर कक्ष स्थापन होणार; जुन्या व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह
अलीकडेच इराणमधील युद्धामुळे आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाला होता, परिणामी रशियन तेलावरील निर्बंधांमध्ये सूट दिली गेली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर अमेरिकेने मार्चमध्ये रशियन तेल वाहतुकीवरील काही निर्बंध शिथिल केले होते. युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धामुळे ही सवलत नंतर वाढवली, पण आता होर्मुझमधून होणारा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर अमेरिका पुन्हा रशियावर निर्बंध लादून युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे प्रयत्न सुरू करू शकते. (India Russia Oil Import)
भारतासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण रशिया भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार असून 53% तेल एकट्या रशियाकडून आयात करतो. त्यामुळे रशियावरील निर्बंध पुन्हा सुरू झाले तर, भारताला रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे कठीण होईल. याशिवाय भारतीय तेल रिफायनरी कंपन्यांना दुय्यम निर्बंधांच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. यामुळे भारताला अधिक महागड्या पर्यायांकडे वळण्यास भाग पडू शकते, त्यामुळे देशाचे आयात बिल वाढेल. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा आणि महागाईचा धोका निर्माण होईल. (India Russia Oil Import)
Join Our WhatsApp Community

