‘सेक्युलर’ देशात हिंदूंच्या उत्सवांसाठी मुसलमानांच्या अनुमतीची गरज काय? – गायत्री एन्

98

मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी सरकारी आणि सार्वजनिक जागा अडवून प्रशासनाला रहदारीचा मार्ग बंद करण्यास भाग पाडले जाते. असे असतांना कोईम्बतुरमध्ये गणेशोत्सवासाठी मुसलमानांची अनुमती का घ्यावी लागते? हा तर थेट भारतीय लोकशाही आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे. असे चालू राहिले, तर भारत लवकरच ‘दार-उल-इस्लाम’ होईल. भारत ‘सेक्युलर’ देश असतांना हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी मुसलमानांच्या अनुमतीची गरजच काय? मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्या उत्सवासाठी कधी हिंदूंची अनुमती घेतात का? असा परखड प्रश्न ‘भारत व्हाईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. यांनी केला. त्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सव : मुसलमान समाजाची अनुमती का ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होत्या.

‘गंगा-जमुनी तहजिब’ (संस्कृती) सांगणे निरर्थक

यावेळी ‘श्रीराम सेने’चे कर्नाटक राज्याचे कार्यदर्शी गंगाधर कुलकर्णी म्हणाले की, हिंदूंची भूमी असतांना त्यावर हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हुब्बळी येथे मुसलमानांकडून तीव्र विरोध केला जात आहे. बेंगळुरूमध्येही हाच प्रकार चालू आहे. हुब्बळी येथील मैदानावर राष्ट्रध्वज फडकवण्यासही मुसलमानांचा तीव्र विरोध आहे. पूर्वी तेथे राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वादावरून झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला होता. केवळ वर्षातून दोन वेळी नमाजपठण करण्यासाठी हिंदू मठाने मुसलमानांना अनुमती दिली असतांना हुब्बळीची जागाच हडपण्याचा हा ‘लँड जिहाद’ आहे. हिंदूंच्या जागेवर हिंदूंच्या उत्सवाला विरोध करणार्‍यांनी ‘गंगा-जमुनी तहजिब’ (संस्कृती) सांगणे निरर्थक आहे. हिंदूंनी स्वत:च्या धर्मावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात आता जागे होण्याची आवश्यकता आहे.

(हेही वाचा अमित शहांच्या टीकेमुळे शिवसेनेचा तिळपापड)

रस्ताही वक्फची संपत्ती असल्याचे मुसलमान दावा करतील

या वेळी कर्नाटक राज्यातील अधिवक्ता शुभा नाईक म्हणाल्या की, एखाद्या ठिकाणी केवळ मुसलमानांची संख्या जास्त आहे, म्हणून हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनुमती मिळत नाही. एकूणच देशात हिंदूंची अवस्था वाईट झाली आहे. असेच चालू राहिले, तर उद्या त्या जागेत जाण्यासाठी देखील मुसलमानांची अनुमती घ्यावी लागेल. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते मोहन गौडा म्हणाले की, देशभरात श्रीरामनवमी, हिंदूनववर्ष यात्रा, नवरात्री आदी सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. यात हिंदूंच्या हत्याही झाल्या. असेच चालू राहिले, तर काश्मिरमध्ये जे झाले, तेच देशभरात होईल. वर्षातून दोनवेळा नमाजपठण केले जाते, म्हणून कर्नाटकातील हुब्बळी मैदान हिंदूंना गणेशोत्सव साजरे करण्यासाठी दिले जात नाही. त्यावर मुसलमान आणि वक्फ मंडळ दावा करत आहे. उद्या रस्त्यावर नमाजपठण केले, म्हणून तो रस्ताही वक्फची संपत्ती असल्याचे मुसलमान दावा करतील. वर्ष 2013 मध्ये वक्फ कायद्यात काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने दिलेल्या पाशवी अधिकारामुळे देशभरात वक्फ मंडळ 6.5 लाख एकरहून अधिक भूमीचे मालक झाले आहे. या बेकायदेशीर कायद्यामुळे देशच त्यांच्या नियंत्रणात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा रहित केला पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.