Trinamool Congress : जुन्या-नवीन पिढीवरून तृणमूल कॉंग्रेसमध्ये महाभारत; दीदी आणि भाचा आमनेसामने

ममता बॅनर्जी जुन्या नेत्यांची बाजू उचलून धरीत आहेत तर त्यांचाच भाचा महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी जुन्या नेत्यांच्या निवृत्तीचा मुद्या रेटून लावला आहे. महत्वाचे म्हणजे, असाच वाद कॉंग्रेसमध्ये उफाळून आला होता आणि परिस्थिती एवढी चिघळली की अद्याप जागेवर येऊ शकली नाही.

163
Trinamool Congress : जुन्या-नवीन पिढीवरून तृणमूल कॉंग्रेसमध्ये महाभारत; दीदी आणि भाचा आमनेसामने
Trinamool Congress : जुन्या-नवीन पिढीवरून तृणमूल कॉंग्रेसमध्ये महाभारत; दीदी आणि भाचा आमनेसामने
  • वंदना बर्वे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) जुन्या आणि नवीन पिढीतील नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून येण्याची शक्यता बळावली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) जुन्या नेत्यांची बाजू उचलून धरीत आहेत तर त्यांचाच भाचा महासचिव अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी जुन्या नेत्यांच्या निवृत्तीचा मुद्या रेटून लावला आहे. महत्वाचे म्हणजे, असाच वाद कॉंग्रेसमध्ये (Congress) उफाळून आला होता आणि परिस्थिती एवढी चिघळली की अद्याप जागेवर येऊ शकली नाही. (Trinamool Congress)

एकेकाळी अर्थात २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात ‘टीम’वरून वाद निर्माण झाला होता. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून नवीन नेत्यांना संधी देण्याचे आवाहन केले होते. मात्र, याचा परिणाम असा झाला की, कॉंग्रेसमधील २८ नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. हा गट ‘जी-२८’ (G-28) म्हणून ओळखला जातो. (Trinamool Congress)

कॉंग्रेससारखी (Congress) बंडखोरी आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. दीदीचे भाचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे (Trinamool Congress) महासचिव अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी पक्षातील जुन्या नेत्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्याची योजना आखली आहे. मात्र, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. जुन्या नेत्यांचे वय वाढल्यामुळे त्यांच्यातील कार्यक्षमता कमी झाली आहे. यामुळे, आपण कुठे थांबले पाहिजे आणि नवीन नेत्यांना जागा करून द्यावी, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे, असे मत अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. (Trinamool Congress)

(हेही वाचा – Truck Driver Strike : ट्रकचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांचा स्कूल बस चालकांना इशारा; म्हणाले,…)

ममता बॅनर्जी विरुद्ध अभिषेक बॅनर्जी

दुसरीकडे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या या विधानाला विरोध दर्शविला आहे. वयाची सत्तरी ओलांडलेले कितीतरी नेते मंत्री, खासदार आणि विविध पदावर आरूढ आहेत. लोकसभेतील तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बांदोपाध्याय म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सर्वोच्च नेत्या आहेत आणि त्यांचाच निर्णय अंतिम मानला जाईल’. ७६ वर्षांचे खासदार सौगत राय यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘निवडणूक कोण लढणार आणि कोण नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्याकडून घेतला जातो. पक्षात कोण राहणार आणि कोण जाणार याचाही निर्णय मुख्यमंत्री घेतात. (Trinamool Congress)

महत्वाचे म्हणजे, अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या या भूमिकेला दस्तुरखुद्य ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विरोध दर्शविला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सन्मानाने वागविण्याचे आवाहन दीदींनी अलिकडेच केले होते. यामुळे, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरुद्ध अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) जवळ आली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा (BJP) सामना करण्याची ताकद केवळ तृणमूल कॉंग्रेसमध्येच (Trinamool Congress) आहे, असा दावा दीदींनी केला होता. परंतु, दीदींचा भाचाच त्यांच्या विरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. (Trinamool Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.