पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल, फडणवीसांच्या विधानाने खळबळ

52

राज्यातील हाय व्होल्टेज अशा राज्यसभा निवडणुकीत भाजपने सांगितल्याप्रमाणे बाजी मारली आणि राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच हादरले असल्याची चर्चा सध्या होत आहे. पण भाजपच्या या विजयात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठे विधान केले आहे. पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल तेव्हा तो सर्वांना दिसेलच, असे विधान फडणवीस यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

(हेही वाचाः सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते, फडणवीसांचा राऊतांना झणझणीत टोला)

ते भविष्यात दिसेलच

विरोधी पक्षाने योग्य काम करायचं असतं, ते आम्ही केलं आहे. पण या विजयावरुन मी एकदम कुठल्याही निष्कर्षाला जाणा-यांपैकी नाही. जेव्हा पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल तो तुम्हाला दिसेलच. पण आम्ही मात्र 2024 साठी सध्या तयारी करत आहोत. 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप पूर्ण बहुमताने जिंकेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मविआत अंतर्गत कलह

मविआ सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. या सरकारमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जेव्हा आम्हाला उमेदवार मागे घेण्याची ऑफर देण्यात येत होती, त्याचवेळी सरकारमधील काही नेते आम्हाला उमेदवार मागे न घेण्याची विनंती करत होते. त्यामुळे त्यांनीच आम्हाला ही निवडणूक बिनविरोध न करायला सांगितले होते, असेही धक्कादायक विधान फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मविआत अंतर्गत कलह असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

(हेही वाचाः भाजपच्या ‘या’ दोन आमदारांनी जे काही केले, त्याने कांदेंचे वांदे झाले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.