आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण घुसलोच तर…; परिवाराच्या मुद्द्यावरून ठाकरे फडणवीस आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे.

160
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण घुसलोच तर...; परिवाराच्या मुद्द्यावरून ठाकरे फडणवीस आक्रमक

शुक्रवार २३ जून रोजी भाजप पक्षाविरुद्ध बिहारच्या पाटणमध्ये संपूर्ण विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. ‘आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरे तिथे गेले आहेत.’ अशा आशयाची फडणवीसांनी टीका केली होती. त्यावरून आता ठाकरे – फडणवीस यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

(हेही वाचा – ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने रविवारी विशेष कार्यक्रम)

नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या प्रमुखांना मार्गदर्शन केले. पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर भाजपाने केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे उत्तर देत म्हणाले, “मी पाटण्याला गेलो होतो, पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे.

देवेंद्र फडणवीस ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
– सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
– मुंबईला कुणी लुटले यावर…
– मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
– मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
– १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…

तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…” अशा भाषेत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.