Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल

129
Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल
Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती सरकार (Devendra Fadnavis) अनेक रणनिती आखत आहे. वर्षा, सागर बंगल्यांवर बैठकांचे धाडसत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मविआला निवडणुकीत टक्कर देण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नागपुरात आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटलांवर (Jayant Patil) निशाणा साधला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठे आहेत? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

(हेही वाचा – Mumbai Crime : २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मनपाच्या २ अभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल )

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “जयंत पाटील (Jayant Patil) हे त्यांच्या पक्षावर खुप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही. एवढी मोठी निवडणुक सुरू आहे, पण जयंत पाटील तुम्हाला (Jayant Patil) कुठे दिसत आहेत का? शरद पवार गटाकडुन रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार (Sharad Pawar) हेच दिसत आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) आहेत कुठे? समझदार को इशारा काफी हैं.” अशी जहरी टीका फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जयंत पाटलांवर केली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; म्हणाले प्रचंड मतांनी निवडून आणणार)

य़ावेळी बोलताना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कल्याण जागेसाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.