Department of Meteorology: मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात ऑरेंज अलर्टसह गारपीटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर

121
Department of Meteorology: मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात ऑरेंज अलर्टसह गारपीटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर

मुंबईकर कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाले आहे. शनिवारी, (६ एप्रिल) कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल, तर २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर २३.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

मुंबईत उन्हाची तीव्रता वाढत आहे. सध्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच कडाक्याच्या उन्हाशी मुंबईकरांचा सामना सुरू होतो. मार्च ते मे अशा तीनही महिन्यात मुंबईकर घामाच्या धारासह उन्हाचा सामना करत असतो, मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांची अस्वस्थता अधिकच वाढत आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल )

पावसाची शक्यता…
राज्यात ७ ते १० एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ‘X’द्वारे प्रसिद्ध केली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.