Devendra Fadnavis: श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; म्हणाले प्रचंड मतांनी निवडून आणणार

189
Devendra Fadnavis: श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; म्हणाले प्रचंड मतांनी निवडून आणणार
Devendra Fadnavis: श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर; म्हणाले प्रचंड मतांनी निवडून आणणार

गेले काही दिवस कल्याणच्या जागेवरून (Devendra Fadnavis) महायुतीतील तिढा सुटत नव्हता. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कल्याण जागेसाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पार्टी (BJP) त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह; दिल्या भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा)

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना महायुती निवडून आणेल.” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – us Austin : अमेरिकेतील ऑस्टिन शहरात शिवजयंतीचा उत्साह धुमधडाक्यात साजरा)

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही. असे सांगितले होते. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला देऊ नयेत, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती. त्यातच आता फडणवीसांनी (Devendra Fadnavis) श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) नावाची घोषणा केली आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.