छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

84

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री झालेल्या राड्यावरून सध्या राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसच याचे मास्टरमार्ईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या राज्यामध्ये अशांतता निर्माण व्हावी हाच शिंदे-फडणवीस सरकारचा एकमेव हेतू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. आता या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देते सगळ्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन केले आहे.

नक्की काय म्हणाले फडणवीस? 

‘छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण काही लोकांना प्रयत्न आहे की, त्याठिकाणी भडकवणारे वक्तव्य करून परिस्थिती अजून चिघळली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी कसे वागल पाहिजे, हे देखील समजून घेतले पाहिजे. त्यामुळे कोणी जर अशाप्रकारचे चुकीचे वक्तव्य करत असेल, तर त्यांनी करू नये. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्या नेत्यांची आहे. पण याला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाहीये. अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे किती राजकीय बुद्धीने बोलले जातेय आणि किती छोट्या बुद्धीने बोलले जातेय, त्याचे खरं म्हणजे हे परिचायक आहे,’ असे फडणवीस माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या तिथे शांतता आहे. तरी देखील ही शांतता राहिली पाहिजे, असा प्रयत्न सगळ्यांना करावा लागेल. म्हणूनच मी म्हटले काही नेते, जाणीवपूर्वक राजकीय वक्तव्य करून तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे, असा प्रयत्न करतायत. स्वतःच्या स्वार्थाकरता हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, तो त्यांनी तात्काळ बंद करावा. शांतपणे आपला सगळा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडावा. कुठेही गडबड गोंधळ होऊ नये, कोणीही एकमेकांच्या समोर येऊ नये, कुठेही शांततेचा भंग होणार नाही, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे.’

(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, मिंधे गटाच्या अनेक टोळ्या..)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.