Devendra Fadnavis: शरद पवारांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर उधळली स्तुतिसुमने

180
Devendra Fadnavis : भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक

बारामतीत नुकतेच नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून रोजगार घेणारे आणि रोजगार देण्याऱ्यांना एकत्र आणण्याचं काम या मेळाव्यातून करण्यात आलं.

राज्यातील सर्वच दिग्गज शनिवारी यानिमित्त एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, फडणवीसांनी बारामतीच्या व्यासपीठावरून अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळताना सांगितले की, गृहमंत्री पद मी तुम्हाला देणार नाही, पण गृहखात्यासाठी तुमची मदत नक्कीच घेईन. अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्यासाठी खूप मेहनत केली आहे. या मेळाव्यासह बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस आयुक्तांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

(हेही वाचा – Gautam Gambhir कडून राजकीय संन्यासाची घोषणा; क्रिकेट करिअरवर करणार लक्ष केंद्रीत)

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं एवढं सुंदर कार्यालय
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, अजित पवारांच्या नेतृत्त्वात बारामतीमधील बस स्थानक हे एखाद्या विमानतळासारखं वाटावं, एवढं सुंदर आणि सुसज्ज आहे. बारामतीमधील पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय किंवा पोलिसांच्या क्वॉर्टर्सच्या इमारती पाहिल्यावर हे सरकारी बांधकाम आहे, असं वाटतंच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं एवढं सुंदर कार्यालय अजित पवारांनी बारामतीकरांना दिलं आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांचं कौतुक केलं.

आता माझ्यामागे लोकं लागतील की, मला बारामतीलाच पोस्टिंग द्या, कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान केवळ बारामतीमध्येच आहे. दादा, मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या. मला आता मोह होत आहे की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. दादा मला हळूच म्हणू शकतील की, पीएमसी कशाला, खातंच माझ्याकडे द्या, पण दादांना खातं देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, मात्र तुमची मदत या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चित घेईल, असे फडणवीसांनी बारामतीच्या मंचावरून म्हटले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.