२ वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणणार! – देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

102
राज्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी काही त्रुटी घालवाव्या लागतील, सवलती द्याव्या लागतील, आम्ही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र पुन्हा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केंद्राचा २ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार 

केंद्राने महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची घोषणा केली आहे. हा २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प असणार आहे. याचा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी फार फायदा होणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्र्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते जसे जसे महाराष्ट्राची बदनामी करतील, तसे मी त्यांना उघडे पाडेन, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.