निदान चार भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा; Uddhav Thackeray यांची मविआच्या नेत्यांकडे मागणी

मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपासोबत जो धोका घेतला तो नको मला, असे ठाकरे म्हणाले.

87

विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, अशी मागणी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याआधी मविआतील घटक पक्षांना केली होती, पण दोनी काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले होते, आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली आहे. जाहीरपणे नको पण निदान चार भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, अशी आळवणी आता उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सूत्रांची माहिती आहे.

ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरवले तर पाडापाडीचे राजकारण होईल, जे आम्हाला मान्य नाही. त्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा. तुम्ही कोणताही चेहरा द्या मी त्याला पाठिंबा देईन असे सांगताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यानंतर मात्र काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरु झाली. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका मांडल्याचे समजते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला तर रणनीती आखता येईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत त्यातच हा निर्णय घेतला जावा, असेही अशी ठाकरे गटाने म्हटले आहे.

(हेही वाचा …तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून Bombay High Court ची सरकारवर आगपाखड)

आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपासोबत जो धोका घेतला तो नको मला, असे ठाकरे म्हणाले. त्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री इथे ठरत नसतो, तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की, लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असे वातावरण तयार झाले. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू. त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणे हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असे स्पष्ट विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मविआच्या मेळाव्यानंतर केले होते.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत निवडणूक लढवल्यानंतर निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाकडे न जाता थेट हरलेल्या दोन्ही काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री बनले. त्यानंतर जनतेसमोर जाताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी मातोश्री मध्ये बाळासाहेबांच्या खोलीत आम्ही दोघेच असतात सत्तेची समान  भागीदारी करू असा शब्द दिला होता, त्यात मुख्यमंत्री पदही येते, हा शब्द भाजपाने पाळला नाही, असे सांगत राहिले. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  मविआच्या नेत्यांना चार भिंतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असे सांगत आहेत, यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी किती सकारात्मक प्रतिसाद देतील, हा प्रश्नच आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.