Samsung ने भारतात गॅलॅक्‍सी वॉचेसमध्‍ये आणली इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशनची सुविधा

71
Samsung ने भारतात गॅलॅक्‍सी वॉचेसमध्‍ये आणली इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशनची सुविधा

सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने गुरुवारी (२२ ऑगस्ट) गॅलॅक्‍सी वॉचेससाठी सॅमसंग हेल्‍थ मॉनिटर अॅपमध्‍ये नवीन वैशिष्‍ट्य इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशन (आयएचआरएन)च्‍या लाँचची घोषणा केली. अॅपच्‍या विद्यमान ब्‍लड प्रेशर व इलेक्‍ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) मॉनिटरिंग क्षमता असलेले ह नवीन वैशिष्‍ट्य आर्टियल फायब्रिलेशन (AFib)ची सूचना देणाऱ्या हार्ट रिदम्‍सचे निदान होण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे गॅलॅक्‍सी वॉच वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याबाबत सर्वांगीण माहिती मिळते.

सॅमसंग हेल्‍थ मॉनिटर अॅपमध्‍ये कार्यान्वित केल्‍यानंतर आयएचआरएन वैशिष्‍ट्य गॅलॅक्‍सी वॉचच्‍या बायोअॅक्टिव्‍ह सेन्‍सरचा वापर करत पार्श्‍वभूमीमध्‍ये अनियमित हार्ट रिदम्‍सची सतत तपासणी करते. सलग मापनांची विशिष्‍ट आकडेवारी अनियमित असल्‍यास गॅलॅक्‍सी वॉच वापरकर्त्‍यांना संभाव्‍य AFib क्रियाकलापाबाबत चेतावणी देते, तसेच अधिक अचूक मापनासाठी त्‍यांच्‍या वॉचचा वापर करत ईसीजी घेण्‍याची सूचना देते. विद्यमान ब्‍लड प्रेशर व हार्ट रेट मॉनिटरिंगसह हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आरोग्‍याबाबत अधिक माहिती देखील देते.

(हेही वाचा – निदान चार भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा; Uddhav Thackeray यांची मविआच्या नेत्यांकडे मागणी)

जगभरात कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार मृत्‍यूचे प्रमुख कारण आहेत आणि ऍरिथिमियाचा प्रकार AFib प्रमुख कार्डियोव्‍हॅस्‍कुलर समस्‍यांसह स्‍ट्रोक, हार्ट फेल्‍युअर व इतर गुंतागूंतीच्‍या वाढत्‍या धोक्‍यासाठी चेतावणी चिन्‍ह मानले जाते. तसेच AFib च्‍या अनेक केसेसमध्‍ये लक्षणे दिसून येत नाहीत किंवा अत्‍यंत शांत असतात, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या धोक्‍याबाबत माहित होत नाही. आयएचआरएन वैशिष्‍ट्याव्‍यतिरिक्‍त, गॅलॅक्‍सी वॉच वापरकर्ते आता त्‍यांच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याच्‍या इतर प्रमुख पैलूंवर देखरेख ठेवू शकतात.

सॅमसंगचे (Samsung) बायोअॅक्टिव्‍ह सेन्‍सरसह सुसज्‍ज हे वैशिष्‍ट्य टूल्‍स देते, जे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याबाबत, तसेच ऑन-डिमांड ईसीजी रेकॉर्डिंगबाबत जाणून घेण्‍यास मदत करतात आणि एचआर अलर्ट फंक्‍शन असामान्‍यपणे उच्‍च किंवा कमी होणाऱ्या हार्ट रेट्सचे निदान करते. इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशन वैशिष्‍ट्य आता नवीन लाँच करण्‍यात आलेले गॅलॅक्‍सी वॉच७ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी वॉच७, तसेच गॅलॅक्‍सी वॉच६, वॉच५ आणि वॉच४ सिरीजचा भाग म्‍हणून उपलब्‍ध आहे. गॅलॅक्‍सी वॉच वापरकर्ते गॅलॅक्‍सी स्‍टोअरच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या डिवाईसेसवरील सॅमसंग हेल्‍थ मॉनिटर अॅप अपडेट करू शकतात आणि त्‍यानंतर अॅपमधील सेटिंग्‍ज मेनूमधील आयएचआरएन वैशिष्‍ट्य कार्यान्वित करू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.