Democratic Offer : मतदान वाढीसाठी हॉटेल व्यावसायिकांचा नवा उपक्रम

२६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, नोएडा ग्रेटर आणि नोएडाचे रेस्टॉरंट मालकही मतदारांना विविध प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. याला डेमोक्रॅटिक ऑफर असे नाव देण्यात आले आहे. नॅशनल रेस्टॉरंट अथॉरिटी ऑफ इंडिया, मतदान करणाऱ्यांना खाण्यापिण्यावर २० टक्के सूट देईल.

105
Democratic Offer मतदान वाढीसाठी हॉटेल व्यावसायिकांचा नवा उपक्रम

देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीची (18th  Lok sabha election) मोठ्या उत्साहात जय्यत तयारी चालू असून, १९ एप्रिल २०२४ रोजी २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान झाले. येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथील गौतम बुद्ध नगरमधील हॉटेल व्यावसायिक नवा उपक्रम राबवणार आहेत. लोकशाहीच्या या महान उत्सवानिमित्त निवडणूक आयोगाने देशातील जनतेला मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. (Democratic Offer)

दरम्यान, ग्रेटर नोएडा (Greater Noida) आणि नोएडाचे हॉटेल मालक मतदारांना मतदानाच्या दिवशी विविध प्रकारचे ऑफर्स देणार आहेत. याला ‘डेमोक्रॅटिक ऑफर’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच नॅशनल रेस्टॉरंट अथॉरिटी ऑफ इंडिया, गौतम बुद्ध नगर भागातील मतदान करणाऱ्या नागरिकांवर खाण्यापिण्यावर २० टक्के सूट देणात येईल.

(हेही वाचा – EVM VVPAT वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला)

रेस्टॉरंट मालकांचे (Restaurant owner) म्हणणे आहे की, भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही सारख्या देशात निवडणुका हा लोकांसाठी सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारांना अशा खास ऑफर्स देत आहोत. असे विधान नॅशनल रेस्टॉरंट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष वरुण खेडा (National Restaurant Authority of India Chairman Varun Kheda) म्हणाले, रेस्टॉरंट मालकांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, पहिल्या टप्प्यातील मतदान अपेक्षेप्रमाणे झाले नाही, त्यामुळे ही ऑफर मतदारांना दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अधिक प्रेरित करेल. तसेच, जे तरुण प्रथमच मतदानासाठी जातील ते या ऑफरद्वारे आकर्षित होतील. असे हॉटेल व्यावसायिकांचे मत आहे. (Democratic Offer)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या बंडखोरीवर काँग्रेसचे मौन; कोल्हापुरातील बंडखोरावर कारवाई)

मतदारांनी आपल्या सोबत मतदान ओळखपत्र आणि मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाईही दाखवावी लागेल. यानंतर, मतदाराच्या बिलावर २० टक्के सूट दिली जाईल. ५० हून अधिक रेस्टॉरंट्स ही खास ऑफर देत आहेत. ही सवलत फक्त २६ एप्रिल पुरतीच लागू नसून, शनिवार २७ एप्रिल पर्यंत लोक रेस्टॉरंटमध्ये जाऊन या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. (Democratic Offer)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.