DCM Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

DCM Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

62
'एका टिप्पणीने महाराष्ट्राचे राजकारण तापले'; शिंदेंनी Congress ला थेट इशारा दिला
'एका टिप्पणीने महाराष्ट्राचे राजकारण तापले'; शिंदेंनी Congress ला थेट इशारा दिला

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde)यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.(DCM Eknath Shinde)

राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत असून, पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करणारा गंभीर अपराध असल्याचेही त्यांनी नमूद केले.(DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माला एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल का? )

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईचे विशेष कौतुक केले. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून पोलिसांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले, असे त्यांनी म्हटले.(DCM Eknath Shinde)

टीईटी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आश्वस्त करताना शिंदे म्हणाले की, ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही.(DCM Eknath Shinde)

महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम बनवणे हे महायुती सरकारचे ठाम ध्येय असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.(DCM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.