Devendra Fadnavis : ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पदाधिकारी

कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे.

71
Devendra Fadnavis : ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पदाधिकारी
Devendra Fadnavis : ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पदाधिकारी

ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला विद्यमान सरकारमधील दोन मंत्र्यांनी संरक्षण दिले, असा आरोप एकीकडे उबाठा गटाकडून सुरू असताना, ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis)

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ललित पाटीलसंदर्भातही भाष्य केले. फडणवीस म्हणाले, ललित पाटील याला अटक झाली १० नोव्हेंबर २०२० ला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला नाशिक शिवसेनेचे प्रमुख केले होते. अटक झाल्यावर पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली. ती १४ दिवस मिळाली. त्यांनी लगेच ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोर्टात आम्ही चौकशी केली नाही, असा अर्ज सुद्धा केला नाही; किंवा पुन्हा कोठडी सुद्धा मागितली नाही. (Devendra Fadnavis)

गुन्हेगाराची साधी चौकशी सुद्धा होऊ नये, यासाठी कोणी दबाव आणला? तत्कालीन मुख्यमंत्री की गृहमंत्र्यांनी? आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. पण आज सांगणार नाही. ही पहिली प्रेस आहे, आणखी प्रेस घेणार. महाराष्ट्र अशांत करू पाहणाऱ्यांना उघडे पडणार, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Minister Dharmendra Pradhan : सर जे. जे. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे)

कंत्राटी भरतीचे पाप ठाकरे, पवार आणि काँग्रेसचे
  • महाराष्ट्रात कंत्राटी भरतीचा गदारोळ केला जातो आहे.
    जे दोषी आहेत, तेच गदारोळ करीत आहेत. कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या पापाचे ओझे आपण का उचलायचे? म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माफी मागावी, त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना जनतेत उघडे करावे लागेल.
  • असाच एक भ्रम मुंबई पोलीस दलाबाबत पसरविला जातो आहे. पण, मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती नाही. १८ हजार ३३१पदांची नियमित भरती सुरू आहे. यात मुंबईतील ७०७६ पोलीस शिपाई आणि ९९४ वाहनचालक पदांचा समावेश आहे. मात्र, नियमित पोलिस भरतीत नियुक्ती पत्रे दिल्यावर वर्षभराचे प्रशिक्षण यात वेळ जातो.
    तोवर पोलीस दल रिकामे ठेवता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, जे शासनाचेच आहे आणि त्यांच्या सेवाही नियमित वापरल्या जातात, त्यांच्याकडून नियमित पोलिस रुजू होईस्तोवर 3000 पोलिस वापरण्याचे ठरविले आहे. राज्यातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न. राज्य सरकार युवकांच्या पाठीशी उभे आहे, असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.