Sanjay Raut : पंतप्रधान मोदींचा अवमान करणे संजय राऊतांना भोवणार; भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

145

उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची औरंगजेबसारखी मानसिकता असल्याचे म्हटले होते. ही टीका संजय राऊतांना अडचणीत आणणारी ठरणार आहे. कारण भाजपाने याप्रकरणी राऊतांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पक्षाच्या सभेत संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते, तेव्हा स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. त्यावेळी संजय राऊत यांनी, ‘नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसिलिए औरंगजेब की मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है’, असे म्हटले होते. या भाषणाची सीडीही आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.

(हेही वाचा South Central Mumbai : दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसची लॉबिंग : उबाठा शिवसेना हा मतदार संघ सोडणार का?)

उद्धव ठाकरेंवरही कारवाईची मागणी 

यानुसार जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, कलम 125 दोन समुदायात द्वेषाची भावना तयार करणे ज्यामध्ये 3 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच भादंविच्या 153 अ, 153 ब, 499 या कलमाचाही तक्रारीत उल्लेख आहे. यामध्ये सुब्रह्मण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन इत्यादी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांच्या निकालांचा दाखल देण्यात आला आहे. या गुन्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मूकसंमती दिल्यामुळे तेही या गुन्ह्यातील भागीदार असल्याचे यात तक्रारीत म्हटले आहे.

तत्काळ गुन्हा दाखल करा  

 त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंना तत्काळ पंतप्रधानांची माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, तसेच संजय राऊत यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी पत्रातून निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. या तक्रारींवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे, संजय मयुख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.