मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदी, शहा, राजनाथ सिंग, नड्डा यांचे दौरे

110
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदी, शहा, राजनाथ सिंग, नड्डा यांचे दौरे
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदी, शहा, राजनाथ सिंग, नड्डा यांचे दौरे

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयार आहे. दोन्ही राज्यांमध्ये जनसंपर्क मोहिम राबविली जात आहे.

भाजपशासित मध्यप्रदेश आणि काँग्रेसशासित छत्तीसगडमधील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. दोन्ही राज्यांत वर्षअखेरीत निवडणूक होणे आहे. निवडणुकीची घोषणा आणि प्रचाराचा नारळ अद्याप फोडला गेला नसला तरी; भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यात व्यापक जनसंपर्क अभियान राबविला जात आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविली जात आहे आणि पुढील दोन महिन्यांत जिल्हा पातळीवर मोठे कार्यक्रम होणार आहेत.

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा या नेत्यांची छत्तीसगडमध्ये लवकरच सभा होणार असल्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह १ जुलै रोजी छत्तीसगडचा दौरा करणार आहेत. ते नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. या ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करतील अशी चर्चा आहे. याशिवाय अमित शहा आणि जेपी नड्डा हेही या महिन्यात छत्तीसगडला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ ऑगस्टला दुर्ग जिल्ह्याला भेट देऊ शकतात. छत्तीसगडमधील पहिल्या आयआयटीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणे आहे.

(हेही वाचा – युवक काँग्रेसच्या बैठकीत राडेबाजी; चार पदाधिकारी निलंबित)

सध्या भाजपच्या व्यापक जनसंपर्क मोहिमेचा मुख्य फोकस केंद्राच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यावर आहे. यानंतर जिल्हा पातळीवर कार्यक्रम घेतले जातील. याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी सभा, मेळावे सुरू आहेत. राजनाथ सिंह बस्तर विभागाच्या या दौऱ्यात केंद्रीय दलाच्या जवानांचीही भेट घेऊ शकतात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा २२ जूनला भिलाई दौरा प्रस्तावित आहे. स्वागतासाठी भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. शहा यांच्या सभेला किमान ५० हजार कार्यकर्ते उपस्थित रहावेत असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या सभेला २० विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते येणार आहेत. ही सभा दुर्गमधील रविशंकर स्टेडियम येथे होवू शकते. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा ३० जूनला छत्तीसगडला जाणार असल्याची चर्चा आहे. ते बिलासपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. बिलासपूर युनिट कामाला लागली आहे. याशिवाय ते राज्याच्या कोअर ग्रुपची बैठकही घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांच्या गृहजिल्ह्यातील राष्ट्रीय अध्यक्षांची ही पहिलीच भेट असेल.

मध्य प्रदेशातही केंद्रीय नेत्यांचे दौरे प्रस्तावित आहेत. पंतप्रधान मोदी २७ जून रोजी पुन्हा एकदा भोपाळचा दौरा करणार असल्याची चर्चा आहे. ते आधी धारला जातील, नंतर भोपाळला येतील. येथे मोदी जबलपूर-इंदूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यानंतर जाहीर सभा आणि रोड शो असा कार्यक्रम प्रस्तावित आहे. यापूर्वी, गृहमंत्री अमित शहा राज्यातील खासदारांशी चर्चा करणार आहेत. अमित शहा २२ जून रोजीच बालाघाट येथे जाणार आहेत. यानंतर जगत प्रकाश नड्डा यांची ३० जूनला मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये सभा होणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.