Rajya Sabha Election 2022: आता काँग्रेसकडून मुनगंटीवारांच्या मतावर आक्षेप,काय आहे कारण

101

राज्यसभा निवडणुकीतील 285 आमदारांचं मतदान आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता काही तासांतच चुरशीच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. पण असं असतानाच या निवडणुकीतील मतदानामध्येही गोंधळ उडाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून तीन मविआ आमदारांच्या मताबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता काँग्रेसनेही भाजपच्या एका मतावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे आता यावर निवडणूक आयोगाकडून काय निकाल मिळणार, हे पाहणं गरजेचं आहे.

काँग्रेसचा आक्षेप

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावरुन आता काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका भाजपचे पोलिंग एजंट असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिली असल्याचे सांगत काँग्रसने हा आक्षेप नोंदवला आहे. काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांनी हा आक्षेप घेतला असून, यावर आता निवडणूक आयोगाकडून सुनावणी होणार आहे.

(हेही वाचाः Rajya Sabha Election 2022: मतदान पूर्ण, अतिरिक्त मतांची अशी आहे जुळवाजुळव)

तथ्यहीन आक्षेप-बावनकुळे

दरम्यान या आक्षेपावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेला हा आरोप खोटा आणि चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी कुणाचीही मतपत्रिका हाताळली नसून, नियमाप्रमाणे मी काम केले आहे. त्यामुळे या आक्षेपामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आयोगाकडून सुनावणी

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार संजय कांदे यांच्या मतांवर याच कारणावरुन भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र ती मतं ग्राह्य असल्याचं सांगताच भाजपने पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला. त्यामुळे आता या आक्षेपावर सुनावणी होत आहे.

(हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेमध्ये झाली गडबड, नंतर झालं काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.