Karnataka CM : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा; शिवकुमार पुढचे मुख्यमंत्री?

कॉंग्रेसशासित कर्नाटकच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे.

60
Karnataka CM : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा; शिवकुमार पुढचे मुख्यमंत्री?
Karnataka CM : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा; शिवकुमार पुढचे मुख्यमंत्री?

कॉंग्रेसशासित कर्नाटकच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे. यामुळे मुख्यमंत्री बदलणार की सरकार कोसळणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Karnataka CM)

मुळात, कॉंग्रेसशासित कर्नाटकमध्ये काही तरी मोठं घडणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचे कारण असे की कॉंग्रेसचे आमदार रविकुमार गौडा यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बढती मिळणार असल्याचा दावा केला आहे. याचा अर्थ, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होणे निश्चित आहे. (Karnataka CM)

विद्यमान सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा येईल, असेही गौडा यांनी म्हटले आहे. यासोबतच शुक्रवारी रात्री गृहमंत्री परमेश्वर यांच्या घरी झालेल्या बैठकीमुळे या अटकळांना उधाण आले आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तुळात घबराट पसरली आहे. (Karnataka CM)

(हेही वाचा – Attack On Russian airport : पॅलेस्टाईन समर्थकांचा विमानतळावर हल्ला; रशियाने घेतला मोठा निर्णय)

मुख्यमंत्री बदलण्याच्या काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. असे असले तरी पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे की सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय घेणे हे हायकमांडचे काम आहे, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. (Karnataka CM)

गृहमंत्री जी परमेश्वरा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री भोजन बैठक संपन्न झाली होती. यामुळे अडीच वर्षांनंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या अटकळांना उधाण आले आहे. वास्तविक, सीएम सिद्धरामय्या, समाजकल्याण मंत्री एचसी महादेवप्पा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीह जारकीहोली यांनी भोजनाला हजेरी लावली होती. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी डिनरला दांडी मारली होती. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Karnataka CM)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.