Attack On Russian airport : पॅलेस्टाईन समर्थकांचा विमानतळावर हल्ला; रशियाने घेतला मोठा निर्णय

इस्लामी घोषणा, संतप्त जमाव आणि रशियन विमानतळावरील हल्लाः इस्रायल-हमास युद्ध रशियातील दागेस्तान विमानतळावर ही घटना घडली. इस्रायलहून एक विमान उतरल्याची बातमी पसरली. यानंतर जमावाने इस्लामी घोषणा देत विमानतळावर हल्ला केला.

17
Attack On Russian airport : पॅलेस्टाईन समर्थकांचा विमानतळावर हल्ला; रशियाने घेतला मोठा निर्णय
Attack On Russian airport : पॅलेस्टाईन समर्थकांचा विमानतळावर हल्ला; रशियाने घेतला मोठा निर्णय

इस्लामी घोषणा आणि शेकडो आक्रमक लोकांची गर्दी. हे दृश्य होते, रशियातील दागेस्तान विमानतळाचे ! (Attack On Russian airport) या विमानतळावर इस्रायलची राजधानी तेल अवीव येथून विमान येत असल्याची अफवा पसरली. त्यानंतर पॅलेस्टाईन समर्थकांचा संताप अनावर झाला. विमानतळाची सुरक्षा यंत्रणाही ही परिस्थिती हाताळू शकली नाही. के. जी. बी. किंवा अंतर्गत गुप्तचर विभागाने याबद्दल व्लादिमीर पुतीन यांना माहिती दिली नाही. ज्यू लोकांना घेऊन इस्रायलहून आलेले विमान उतरल्याची बातमी पसरताच उन्मत्त जमावाने विमानतळाचे सर्व दरवाजे फोडले. त्यांना धावपट्टी काबीज करायची होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न केला. सध्या रशियाने दागेस्तानमधील हे मुख्य विमानतळ बंद केले आहे. (Attack On Russian airport)

(हेही वाचा – Youngest Indian Golfer : १३ वर्षीय कार्तिक सिंग एशिया पॅसिफिक हौशी विजेतेपद स्पर्धेत खेळणारा सगळ्यात लहान गोल्फपटू)

सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ भीतीदायक आहेत. काहींच्या हातात पॅलेस्टिनी झेंडे होते. विमानतळावरील सुरक्षा डावलून पार करून गर्दी पुढे सरकत होती. सुरक्षा कर्मचारी त्यांना माघार घेण्यास सांगत असतांनाचे व्हिडिओत दिसत आहे. विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत. एका व्हिडिओमध्ये, विमानतळाच्या बाहेर उन्मत्त जमाव एका कारला लक्ष्य करत आहे. निमलष्करी दलाच्या जवानांनी परिस्थिती आटोक्यात घेतली आहे. (Attack On Russian airport)

इस्रायलने रशियन अधिकाऱ्यांना इस्रायली आणि ज्यूंचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. जेरुसलेममधील परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉस्कोमधील इस्रायली राजदूत रशियन अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत. निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायली नागरिकांना आणि ज्यूंना कोठेही इजा करण्याचा कोणताही प्रयत्न इस्रायल गांभीर्याने घेतो.”

“इस्रायलची अपेक्षा आहे की रशियन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्यांनी सर्व इस्रायली नागरिकांचे आणि ज्यूंचे संरक्षण करावे, ते कोणीही असोत, आणि दंगलखोर आणि यहुदी आणि इस्रायली लोकांविरुद्ध बेलगाम भडकावणार्‍यांवर कठोर कारवाई करावी,” असे स्टेट डिपार्टमेंटच्या निवेदनात म्हटले आहे. (Attack On Russian airport)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.