Kasba Bypoll Election Result 2023: भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचा विजय; रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी

183

कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून कसब्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाला पराभवाची धूळ चारून रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. हा विजय जनता आणि महाविकास आघाडीचा असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. पण कसब्यातील पोटनिवडणुकीचा निकाला हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोणाला किती मते मिळाली? 

मविआचे रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली असून भाजपचे हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली आहेत.

अपयशामुळे चंद्रकांत पाटलांना नामुष्कीचा सामना करावा लागणार

दरम्यान या पोटनिवडणुकीत भाजपचे ‘डिसिझन मेकर’ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, कसब्यातील अपयशामुळे पाटील यांना नामुष्कीचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदार संघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर आले आहे.

धंगेकरांचा राजकीय प्रवास

रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना, मनसे आणि आता कॉंग्रेस असा राहिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू धंगेकर होते. मनसेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले होते. मनसेतच त्यांचे राजकीय वजन वाढले. चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघात अनेक कामे केली आहेत.

मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून धंगेकर निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये त्यांची चांगली पकड राहिली आहे. शिवाय त्यांची सामन्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे सुरुवातीपासूनच ठरले होते.

(हेही वाचा – कसब्यात भाजपचा गड कोसळणार, चिंचवडमध्येही घाम फुटणार; पोटनिवडणुकीच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.