Lok Sabha Election 2024: पवार आणि ठाकरेंसमोर काँग्रेस झुकली, सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर होताच विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा

लोकसभा निवडणूक २०२४साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.

118
‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

महाविकास आघाडीचा सांगलीच्या जागेचा तिढा मिटला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मविआच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान, सांगलीची जागा ठाकरे गटाला जाहीर होताच काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत, तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर शुकशुकाट दिसून येत आहे. हा निर्णय योग्य नसल्याचे मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह !)

मविआचा फॉर्म्युला निश्चित
ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या जागेसाठी काँग्रेसदेखील आग्रही असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. अखेर या जागेचा तिढा मिटला असून ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. शिवसेनेला २१ जागा, काँग्रेसला १७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा वाटप करण्यात आले आहे, तर भिवंडी मतदारसंघ देखील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने काँग्रेसने ठाकरे-पवारांसमोर नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
सांगलीच्या घराघरांत काँग्रेस आहे. इथे निवडणूक लढण्यावर आम्ही ठाम आहोत. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निर्णय होईल. तो आमच्या बाजूनंच येईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे सांगलीतील इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बोलून दाखवला होता. तर सांगली काँग्रेसचीच आहे, हा गड लढवायचा आणि जिंकायचाच असे म्हटले आहे. सांगली ही काँग्रेसचीच असून, ती आपण सोडायची नाही, असे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी म्हटले होते. यानंतर आता ठाकरे गटाला जागा मिळाल्यावर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.