Congress : काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर; राहुल गांधी कुठून लढवणार निवडणूक?

186

नवी दिल्ली इथे झालेल्या काँग्रेसच्या (Congress) केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेस देशभरात इंडि आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने ज्या मतदारसंघांचे जागावाटप निश्चित झाले आहे, तेथील उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

२४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक

निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला आव्हान देण्यासाठी काँग्रेस (Congress) प्रयत्नशील असून उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची खबरदारी काँग्रेसकडून घेण्यात आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांमध्ये १५ उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, तर २४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक आहेत. या ३९ उमेदवारांमध्ये १२ उमेदवारांचं वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, तर ८ उमेदवार हे ५० ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. तसेच १२ उमेदवार ६१ ते ७० आणि ७ उमेदवार ७१ ते ७६ वर्षे वयोगटातील आहेत. याबाबत काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माहिती दिली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.