Video: वर्धापन दिनी गालबोट! काँग्रेस झेंडा फडकण्याऐवजी पडला सोनियांच्या हातात…

162

काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात एक विचित्र घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या या ऐतिहासक वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा कार्यक्रम आज होता. मात्र, यावेळी गालबोट लागल्याचे दिसले. वास्तविक, पक्ष कार्यालयात स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे अनेक बडे नेतेही सहभागी झाले होते. सोहळ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ध्वजारोहण करत असताना काँग्रेसचा झेंडाच खाली पडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.

पक्ष पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

सलग दोन लोकसभा निवडणुका हरलेली आणि राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसमोर निष्प्रभ ठरलेली काँग्रेस  पुन्हा एकदा बळकट होण्याचा प्रयत्न करत आहे. स्थापना दिनानिमित्त धरणे-निदर्शने आणि आंदोलनाच्या रणनीतीवर पुढे जाण्याची शपथ नेते व कार्यकर्ते घेणार आहेत. काँग्रेस आता बेरोजगारी आणि सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण या मुद्द्यावर बोलणार आहे.

 ( हेही वाचा :पंतप्रधान मोदी आज कानपूर दौऱ्यावर; मेट्रो विभाग, बिना पंकी प्रकल्पाचा करणार शुभारंभ )

काँग्रेसचे प्रशिक्षण अभियान सुरू

समितीच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाने देशभरातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आधीच प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. जिल्हा आणि ब्लॉक स्तरापर्यंत सुमारे 5500 प्रशिक्षक तयार केले जात आहेत, जे चहाची दुकाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी समाजातील वादविवादांमध्ये रस्त्यावरील प्रवक्त्याच्या भूमिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.