पंतप्रधान मोदी आज कानपूर दौऱ्यावर; मेट्रो विभाग, बिना पंकी प्रकल्पाचा करणार शुभारंभ

70

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील कानपूरला भेट देणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता आयआयटी कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यासह पंतप्रधान मोदी आज दुपारी दीड वाजता कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन करतील. यावेळी ते बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहे.

महत्त्वपूर्ण कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प

कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण भागाचे उद्घाटन हे विकासाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे. आयआयटी कानपूर ते मोती झील हा संपूर्ण ९ किमी लांबीचा मार्ग आहे. पंतप्रधान याच कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करतील आणि आयआयटी मेट्रो स्टेशनपासून गीता नगरपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. कानपूरमधील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण लांबी 32 किमी असून या प्रकल्पासाठी जवळपास 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

बहुउत्पादक पाईपलाईन प्रकल्पाचेही होणार उद्घाटन

पंतप्रधान मोदी आज बिना पंकी बहुउत्पादक पाईपलाईन प्रकल्पाचेही उद्घाटन करणार आहेत. 356 किमी लांबीच्या या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 3.45 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. मध्य प्रदेशातील बिना रिफायनरीपासून कानपूरमधील पंकीपर्यंत विस्तृत या प्रकल्पासाठी जवळपास 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेशातील बीना रिफायनरीमधून पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्यास मदत होईल.

(हेही वाचा- खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला)

काय म्हणाले मोदी…

पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहे. यासंदर्भातील ट्विट मोदींने केले असून ते म्हणाले की, “या महिन्याच्या २८ तारखेला दीक्षांत समारंभाला संबोधित करण्यासाठी आयआयटी कानपूरला भेट देण्यासाठी मी उत्सुक आहे. ही एक उत्कृष्ट संस्था आहे, ज्याने विज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. मी सर्वांना त्यांच्या सूचना शेअर करण्यासाठी आमंत्रित करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.