शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा, म्हणाल्या…

87

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करुन दिली आहे. वर्षा गायकवाड या कालच्या अधिवेशनात हजर असल्याने चिंता वाढली आहे. वर्षा गायकवाड यांनी काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती, त्यानंतर मी स्वत: ला आयसोलेट करुन घेतलं असल्याचं  सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे.

असं आहे ट्विट

आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणतात, मला आज सकाळी कळलं, की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.

 (हेही वाचा :‘किशोरवयीन’ मुलांना मिळणार लस, अशी करा ‘कोविन’ अॅपवर नोंदणी )

चिंता वाढली

काँग्रेस नेते आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना ससंर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. सोमवारी के. सी. पाडवी आणि मंगळवारी वर्षा गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचं रविवारी समोर आलं होतं. त्यानंतर विधानसभेतील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप आमदार समीर मेघे यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यांनी स्वतःच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.