CM Fadnavis Delhi Tour : मुख्यमंंत्री फडणवीसांच्या गुप्त भेटीने राज्यातील सत्तासंघर्षाला नवं वळण; ‘त्या’ भेटीचं गुपित काय?

CM Fadnavis Delhi Tour : मुख्यमंंत्री फडणवीसांच्या गुप्त भेटीने राज्यातील सत्तासंघर्षाला नवं वळण; 'त्या' भेटीचं गुपित काय?

194
CM Fadnavis Delhi Tour : मुख्यमंंत्री फडणवीसांच्या गुप्त भेटीने राज्यातील सत्तासंघर्षाला नवं वळण; 'त्या' भेटीचं गुपित काय?
CM Fadnavis Delhi Tour : मुख्यमंंत्री फडणवीसांच्या गुप्त भेटीने राज्यातील सत्तासंघर्षाला नवं वळण; 'त्या' भेटीचं गुपित काय?
प्रतिनिधी | नवी दिल्ली

​राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आठवडाभरातील दुसरा दिल्ली दौरा(CM Fadnavis Delhi Tour)सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. वरवर पाहता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी हा दौरा असल्याचे भासविले जात असले, तरी पडद्यामागची खरी कथा काही वेगळीच असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी घेतलेली भेट ही केवळ ‘सदिच्छा भेट’ नसल्याचे राजकीय पंडित सांगत असून, या भेटीने महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण केली आहे.(CM Fadnavis Delhi Tour)

​अजित पवार यांच्या अकाली आणि चटका लावून जाणाऱ्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता ‘वारसदार’ कोण, यावरून सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुसीचा आणि विलीनीकरणाच्या चर्चांचा परिणाम थेट महायुतीवर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर आता थेट पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याने, महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणांमध्ये काहीतरी मोठी ‘भाकरी’ फिरवली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.(CM Fadnavis Delhi Tour)

(हेही वाचा – Tarique Rahman यांच्या शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना मिळणार आमंत्रण )

​खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भविष्यातील भूमिकेवर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा एक गट सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विलीन होऊ इच्छितो, तर दुसरा गट पुन्हा शरद पवारांच्या सावलीत जाण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी कोणत्या रणनीतीचा अवलंब करणार, याचा आराखडा या भेटीत निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. विशेषतः, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ची नवी आवृत्ती पाहायला मिळू शकते, अशा हालचाली दिल्लीत घडत आहेत.(CM Fadnavis Delhi Tour)

​दुसरीकडे, नितीन नवीन यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्याची ही फडणवीसांची पहिलीच वेळ होती. मात्र, तासाभराच्या या बंदद्वार चर्चेत केवळ शुभेच्छा नव्हत्या, तर महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांचे गणित आणि पक्षबांधणीचा ‘ब्लूप्रिंट’ही मांडला गेल्याचे समजते. एका बाजूला राष्ट्रवादीतील अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून होणारे आरोप, या चक्रव्यूहातून महायुतीला बाहेर काढण्यासाठी फडणवीसांनी दिल्लीत हा नवा ‘मास्टर प्लॅन’ तयार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीतून मुंबईत परतल्यानंतर फडणवीस नेमका कोणता धमाका करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.(CM Fadnavis Delhi Tour)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.