CM Eknath Shinde : जगभरात मोदींच्या नावाला मान; देशात पुन्हा मोदीच येणार

पंतप्रधान मोदी म्हणाले होते 'शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे.' अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर ती वास्तवात देखील दिसते. मोदींच्या रूपात आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळत आहेत.

154
CM Eknath Shinde : जगभरात मोदींच्या नावाला मान; देशात पुन्हा मोदीच येणार

आज म्हणजेच शुक्रावर १९ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. या महिन्यातील मोदींचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. त्यामुळे त्यांचा हा सोलापूर दौरा अधिक विशेष आहे. या दौऱ्यादरम्यान नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित (Solapur Ray Nagar Housing Society) कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. ३५० एकर परिसर, ८३४ इमारती , ३० हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Ram Mandir Programme Schedule: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पाच तास चालणार कार्यक्रम; कसे असेल नियोजन)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. तसेच पुढच्या निवडणुकांमध्ये देखील मोदीच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईलच, पण महाराष्ट्रातही पुन्हा डबल इंजिन सरकार सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब)

मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावरच नसते –

पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की; “पंतप्रधान मोदी म्हणाले होते ‘शिलान्यास हमने किया है और उद्घाटन भी हम करेंगे.’ अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांचे उद्घाटन देखील मोदींनी केले. मोदींजींची गॅरंटी फक्त कागदावर नसते तर ती वास्तवात देखील दिसते. मोदींच्या रूपात आम्हाला एका मोठ्या नेतृत्वाचे आशीर्वाद मिळत आहेत”.

जगभरात मोदींच्या नावाला मान – 

पुढे बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की; ” मी नुकताच दावोस दौऱ्यावरुन परत आलो. डाओसमध्ये ३ लाख ५३ हजार करोडचे करार झाले. यादरम्यान मला अनेक जण भेटले. त्या सर्वांच्या तोंडी फक्त मोदीजींचे नाव होते. अनेक मोठ्या व्यक्तींना, उद्योगपतींना गॅरंटी आहे की मोदी पुन्हा एकदा सत्तेत येणार. तसेच महाराष्ट्र राज्यात देखील डबल इंजिनचे सरकार सरकार स्थापन होणार.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशमधील कैद्यांनी बनविले ५१ हजार दिवे, ४० हजार ध्वज)

अबकी बार चारशे पार –

पंतप्रधान मोदींच्या रूपात आपल्याला एक ग्लोबल लीडर, एक व्हिजनरी लीडर आपल्याला मिळाले आहेत. अयोध्येत आज राम मंदिर पूर्ण होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे हाऊस होत आहेत. संपूर्ण देशात रे हाऊस व्हायला हवं असे मोदींजींनी सांगितले होते. तसेच देशातील ८० करोड लोकांना मोफत अन्न पंतप्रधान देत आहेत. त्यामुळे आता देशातल्या लोकांनीच गॅरंटी दिली आहे की ‘फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार चारशे पार’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.