Governor Ramesh Bais : नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब

संवाद हरवत चालला आहे. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाही, त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

102
Governor Ramesh Bais : नवी पिढी हिंदी, मराठी लिहू - वाचू शकत नाही ही चिंतेची बाब

भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जगविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजे, असे प्रतिपादन (Governor Ramesh Bais) राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

(हेही वाचा – Coaching Centers : कोचिंग क्लासमध्ये १६ वर्षांनंतरच मिळणार प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केली नवीन मार्गदर्शकतत्वे)

साहित्य, संस्कृती, शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी (दि. १८) राज्यपाल बैस यांच्या हस्ते ‘वाग्धारा नवरत्न’, ‘स्वयंसिद्ध’, ‘यंग अचिव्हर्स’ व जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह अंधेरी मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते (Governor Ramesh Bais) बोलत होते.

काय म्हणाले राज्यपाल रमेश बैस ? 

इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मन, फ्रेंच, मँडरिन या भाषा देखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष गाठता येणार नाही असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले.

(हेही वाचा – Ram Mandir Programme Schedule: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पाच तास चालणार कार्यक्रम; कसे असेल नियोजन)

उत्तम वाचनाला पर्याय नाही –

आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे घरातला संवाद हरवत चालला आहे. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हाट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाही, त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेल, असे राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) सांगितले.

‘वाग्धारा नवरत्न’ सन्मान – 

ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना ‘वाग्धारा जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना ‘वाग्धारा नवरत्न’ सन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकर, अभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना ‘वाग्धारा’ स्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला. (Governor Ramesh Bais)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.