घरवापसीनंतर मुलीच्या अपत्यांना हिंदू कायदा लागू व्हावा, यासाठी बदल करू; नाशिकमध्ये CM Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

घरवापसीनंतर मुलीच्या अपत्यांना हिंदू कायदा लागू व्हावा, यासाठी बदल करू; नाशिकमध्ये CM Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

125
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis

लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा आहेच, मात्र अशा प्रकरणांमध्ये घरवापसी केलेल्या मुलींच्या अपत्यांना यापुढे हिंदू कायदा लागू होईल, वारसा हक्क कायद्यात त्यासाठी बदल करण्याच्या दिशेने शासन कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत दिली. (CM Devendra Fadnavis)

नाशिक येथे ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील सुमारे ३०० संत सहभागी झाले असून त्यास रविवारी फडणवीस यांनी संबाेधित केले. सनातन धर्म जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू

धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आधीच अस्तित्वात आहे. मुस्लिम तरुणाशी विवाह केल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी शासनाकडे ठोस कारण असेल. त्यानंतरही घरवापसी झालेल्या व पुन्हा हिंदू धर्मात आलेल्या मुलींच्या अपत्यांना आईचाच धर्म लागू व्हावा, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)

धर्मरक्षण करणाऱ्याला व्यक्तींना शस्त्र परवाना देण्यात येणार का? या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची सुरक्षा व्यवस्था सक्षम असून महाराष्ट्र पोलिस रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. (CM Devendra Fadnavis)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.