Churchgate Hostel Murder Case : सर्व शासकीय वसतीगृहांचे सुरक्षा ऑडिट करणार – चंद्रकांत पाटील

उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्व शासकीय वसतीगृहांचे ऑडिट करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.

102
मुंबईतील चर्चगेट परिसरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवार, ६ जून रोजी आढळून आला होता. मुलीची हत्या करून खोलीत कोंडून ठेवले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी पळून गेला. मुलीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. या मुलीसोबत बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. वसतिगृहात काम करणारा तरुण हत्येनंतर फरार झाला आहे. त्याचा मृतदेह देखील सापडला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश सरकारने दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्व शासकीय वसतीगृहांचे ऑडिट करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. १४ जून २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सुचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.