Chitra Wagh vs Uddhav Thackeray : नेत्यांचा अवमान केला तर त्याच भाषेत प्रत्युत्तर; चित्रा वाघ यांचा इशारा

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे.

89
Chitra Wagh vs Uddhav Thackeray : नेत्यांचा अवमान केला तर त्याच भाषेत प्रत्युत्तर; चित्रा वाघ यांचा इशारा
Chitra Wagh vs Uddhav Thackeray : नेत्यांचा अवमान केला तर त्याच भाषेत प्रत्युत्तर; चित्रा वाघ यांचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्याबद्दल जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही वाघ यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला भाजपच्या वतीने चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात भारताची मान उंचावली, मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे. या नेत्यांच्या बालिशपणाची कीव येते. स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदूषकासारखी झाली आहे.

(हेही वाचा – Mumbai Traffic Police : तुमचे गाडीवरील दंड थकित आहेत का, ‘इतक्या’ दिवसांत दंड भरला नाही, तर कोर्टात उभे रहावे लागेल…)

विदूषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात, पण हे कामदेखील ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही, अशी टीका त्यांनी केली. महिला मोर्चा तर्फे आम्ही ठाकरे यांना विदुषकाचा पोषाख पाठवत असून हा पोषाख पाहून ठाकरे यांना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. ठाकरे यांच्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत. मात्र, यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल, असेही वाघ यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.