Chandrakant Patil : उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतींच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीची मंजूरी

यावेळी वित्त, नियोजन, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

64
Chandrakant Patil : उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतींच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीची मंजूरी
Chandrakant Patil : उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतींच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीची मंजूरी

उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतीच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी वित्त, नियोजन, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Cabinet Meeting In Marathwada : तब्बल ७ वर्षांनी मराठवाड्यात होणार कॅबिनेट बैठक)

यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत डॉ. होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई, विज्ञान संस्थेतील आण्विक व विकिरण प्रयोगशाळा इमारत बांधकामासाठी रु.२४.२५ कोटी, सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, मुंबई वस्तीगृह बांधकामासाठी रु. ८९.५२ कोटी, वांद्रे मुंबई येथील सर ज. जी. कला संस्थेच्या कला वस्तीगृह व वास्तुशास्त्र वस्तीगृह इमारत बांधकामासाठी रु. १९९.७३ कोटी, शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी रु. ५९.२६ कोटी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास रु. ५४७.२७ कोटी, नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेसाठी आवश्यक विविध बांधकामासाठी १७४.७४ कोटी रुपये, तंत्रनिकेतन बांद्रा येथील मुला मुलींचे वस्तीगृह इमारत बांधकाम अशा एकूण सात प्रकल्प बांधकामांस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी जवळपास ११०० कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.