‘तिथे वसुली शिवाय काहीच नव्हतं…’, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर चित्रा वाघ यांचा टोला

82

माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर आणि भाजप आणि मनसेकडून जोरदार टीका होता आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत सडकून टीका केली आहे.

काय ती मुलाखत, काय ती उत्तरं…

मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या. पण तिथे वसुली शिवाय काहीच नव्हतं, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरात मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

हेही हिंदुत्व होतं?

उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरही चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या आणि हिंदू आतंकवादाची संकल्पना मांडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो हे ही आमचं हिंदुत्व म्हणूनही सांगा ना, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.